Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
March 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 
       

मुंबई : आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरण आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या ‘एकतर्फी’ व्यापारावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, जेफ्री एपस्टिन अत्यंत क्रूर आणि नीच मनुष्य होता. याच्याशी संबंध ठेवणारे सर्व लोकं ही त्याच वृत्तीची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते. इथल्या जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारला पाहिजे. (Mumbai protest)

सुजात आंबेडकर यांनी माध्यमांवरही टीका केली आणि म्हटले की, आजचा गोदी मीडिया भाजपच्या खिशात बसलाय, त्यामुळे ते मोदी सरकारला प्रश्न विचारत नाहीये.

पुढे ते म्हणाले, जगभरातील ज्या लोकांचे नाव एपस्टिन फाईल मध्ये आले आहेत, त्या लोकांनी राजीनामे दिले आहेत. भारतातील मंत्री त्या बाबत काहीच बोलत नाही. आमची मागणी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. कारण, आपला पंतप्रधान एका बलात्कारी माणसाचा मित्र आहे. भारतातून 30 लाख मुली गायब आहेत. याचे उत्तर पंतप्रधानने दिले पाहिजे. (Mumbai protest)

यावेळी कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणाबाजीसह केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे CSMT परिसरात मोठी गर्दी उसळली असून, राजकीय वर्तुळात या आरोपांमुळे चर्चा सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे. 


       
Tags: donald trampEpstein FilesMaharashtramumbaiMumbai protestnarendra modiPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

Next Post

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Next Post
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home