सोलापूर : चाकूर तालुक्यातील वडवळ गावात वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सय्यद सलीम यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष शरद शिंगारे, जिल्हा महासचिव रोहित सोमुश्ची, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, खय्युम शेख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी वंचित बहुजन आघाडीच्या आगामी वाटचालीसंदर्भात विचार व्यक्त केले. समाजातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यावर यावेळी भर देण्यात आला. या नव्या शाखेमुळे पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कुणी काय खावे हे तुम्ही कोण सांगणार?
- धनाजी कांबळे भारत हा मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक लढे लढले गेले आणि अनेकांना बलिदान द्यावे...
Read moreDetails