Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

mosami kewat by mosami kewat
July 24, 2025
in बातमी
0
पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

‎अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पारस गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
‎
‎यावेळी नागरिकांनी तक्रार केली की, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची योग्य माहिती घेतली नाही. केवळ घरमालकांचे आणि मोबाईल नंबर लिहून घेण्यात आले, असे नुकसानग्रस्तांनी सांगितले. नागरिकांच्या या तक्रारी ऐकून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी तालुका पदाधिकारी आणि तालुका महिला आघाडी अध्यक्षांना बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्याच्या सूचना दिल्या.
‎
‎या भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासोबत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनुराधाताई डांगे, गजानन गवई, जायदाबी ताई, गजाननभाऊ दांदळे (जि.प. सदस्य), पद्माकर तायडे (मा. ता. अध्यक्ष भारिप), भास्कर सिरसाट (सर्कल अध्यक्ष), शेख शारिक भाई (मा. ता. कोषाध्यक्ष), शेख रईस भाई, हमिद भाई (मा. प.स. सदस्य), विनित भारसाकडे (सर्कल उपाध्यक्ष), प्रदीप तायडे (युवक महासचिव), शेख जमिल, नितेश तायडे, बाबुराव इंगळे, पारस सर्कल पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: negligenceParas villagevbaforindiaVillage
Previous Post

मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

Next Post

‎वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर द्वारे सिंहगड ट्रेकिंगचे आयोजन

Next Post
‎वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर द्वारे सिंहगड ट्रेकिंगचे आयोजन

‎वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर द्वारे सिंहगड ट्रेकिंगचे आयोजन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान
बातमी

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

by mosami kewat
February 24, 2026
0

-संजीव चांदोरकर ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये लावलेल्या आयात करात महत्वाचा फरक आहे ! आपले ऐकले नाही...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

February 24, 2026
अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

February 24, 2026
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

February 24, 2026
जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

February 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home