Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
April 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
नांदेड : वाढत्या महागाई आणि गॅस सिलिंडर दरवाढीच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाची पूर्वतयारी बैठक नांदेड येथील विसावा हॉटेलमध्ये पार पडली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवणार आहेत. (Vanchit bahujan aghadi)

बैठकीस राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, राज अटकोरे, गटनेते प्रशांत इंगोले, जिल्हा महासचिव रवि पंडीत, दिपक मगर, जिल्हा संघटक संजय टिके, माजी शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नगरसेवक व प्रतिनिधींनीही आपल्या मनोगतातून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. (Vanchit bahujan aghadi)

यावेळी आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. गॅस सिलिंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी ६ एप्रिल रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Gas cylinderGas Cylinder ShortageLPGMaharashtranandedVanchit Bahujan Aghadi
Previous Post

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

Next Post

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home