नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 8 येथील वाहतूक सिग्नल शाळेच्या वेळेत सुरू करण्यात यावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईच्या वतीने रबाळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पावळे यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी शाळेच्या वेळेत हा सिग्नल बंद असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक पावळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात, सकाळी 7 वाजता सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक तुकाराम पावळे यांनी लवकरच सिग्नल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव अजय शिंदे, उपाध्यक्ष दीपक बाणाईत, सचिव संदेश हत्तर्गे, सदस्य संदीप वाघमारे आणि मल्लिनाथ सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात...
Read moreDetails