बीड : वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर, समता सैनिक दलाचे डॉ. स्वप्नील माळंगीकर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमारे सर, यशपाल बचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयासमोरील गार्डनमध्ये ही बैठक घेण्यात आली.बैठकीत सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 सप्टेंबर 2025 रोजी परळी येथे होणाऱ्या भव्य एल्गार सभेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली.
तसेच सभेच्या आयोजनासाठी लागणाऱ्या खर्चासाठी पदाधिकाऱ्यांनी तात्काळ 70 हजार रुपयांचा निधी जमा करून योगदान दिले. या बैठकीत कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.