Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 30, 2025
in बातमी
0
Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

       

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती, जनावरं, घरे, खत, बियाणे, शेतीमाल तसेच मशागतीची साधने वाहून गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकरी बांधवांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत असून, शेतकऱ्यांचा संसार पुन्हा सुरळीत होण्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागेल, अशी भीषण परिस्थिती आहे.

सरकारने जाहीर केलेली प्रति एकर ३४०० रुपयांची मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे, असा आरोप करत आज वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या –

  1. सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.
  2. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी.
  3. पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
  4. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करावेत.
  5. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे.
  6. बँकांकडून हप्त्यांचा तगादा त्वरित थांबवावा.
  7. रोगराई वाढू नये म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी व औषधांचा तुटवडा होऊ देऊ नये.
  8. फार्मर आयडीची अट रद्द करून सरसकट पंचनामे करावेत.

निवेदनानंतर बोलताना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलनाचा मार्ग अवलंबेल.

या निवेदन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव विनोद इंगळे, शहर उपाध्यक्ष गौतम थापटे, महिला शहराध्यक्ष सुरवशे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रवी पोटे, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, यशवंत शेठ इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AgriculturalFarmerMaharashtraMonsoonrainsolapur
Previous Post

Madhya Pradesh : अवैध खाणकाम प्रकरणी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस नेत्याला १ अब्ज, २४ कोटी रुपयांचा दंड

Next Post

World Para Archery championship : भारताची  शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक 

Next Post
World Para Archery championship : भारताची  शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक 

World Para Archery championship : भारताची  शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट
बातमी

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

by mosami kewat
October 3, 2025
0

(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या...

Read moreDetails
विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

October 3, 2025
औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात!

औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात! २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार

October 3, 2025
नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

October 3, 2025
अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

October 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home