डोंबिवली : कल्याण येथे विनायक सावरकर लिखित ‘संगीत सन्यस्त खड्ग’ या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आले आहेत. या नाटकाचा प्रयोग उद्या कल्याण डोंबिवली शहरात आयोजित करण्यात आला आहे.
या नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली महानगरतर्फे आज पोलिसांना निवेदन देऊन हे नाटक दाखवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे कल्याण अध्यक्ष विशाल विष्णू पावशे व कार्यकारिणी सदस्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले.
यावेळी सांगण्यात आले की, “या नाटकामुळे सर्व बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या असून समाजात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे हे वादग्रस्त नाटक कल्याण शहरात दाखवू नये. याआधी सुद्धा या नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुणे, मुंबईत आंदोलन केले आहे.” वंचित बहुजन आघाडीने या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे तातडीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.