Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
       
हिंगोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. ३० पैकी २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही जनावरे दगावली असून, जमिनीही खरडून गेल्या आहेत.

गेल्या २४ तासांत सरासरी ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २२०.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून एकूण ५८९.६ मिमी (११०.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट भागात झालेल्या पावसामुळे धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ओढे-नाल्यांमधील पाणी शेतात साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना राजूभाऊ इंगोले (जिल्हा कार्याध्यक्ष), सिद्धांत गायकवाड (जिल्हा महासचिव), योगेशभाऊ नरवाडे (युवा जिल्हा अध्यक्ष), लखन खंदारे (युवा सहसचिव), रमेश इंगोले (कार्यकर्ते) आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: HingoliMaharashtraMonsoonrainRainfall
Previous Post

Next Post

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Next Post
त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!
बातमी

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

by mosami kewat
September 21, 2026
0

- राजेंद्र पातोडे मागील १२ वर्षांत उद्योगपतींची तब्बल ९० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ अथवा राइट-ऑफ झाल्याचे दिसत आहे; मात्र...

Read moreDetails
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home