अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथे गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना ग्रामसभेच्या ठरावाद्वारे बेघर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात ग्रामसभा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निघोज येथील मदारी समाजाची ही 15 कुटुंबे गेली तीन दशके याच गावात राहत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्यांना बेघर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आवाज उचलला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि बेघर झालेल्या मदारी समाजातील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. जाधव यांनी या कृतीला अन्यायकारक ठरवत, तात्काळ बेघर कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची आणि यास जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाचे आणि लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच असा प्रकार घडल्याने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails