औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे. याच उद्देशाने पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू असून, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे एक भव्य जाहीर सभा नुकतीच पार पडली.
सत्तेत जाण्याची संधी कार्यकर्त्यांना
यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी हा शेतकरी, कष्टकरी, युवक आणि आरक्षणवादी जनतेच्या मुद्द्यांसाठी लढणारा पक्ष आहे.

पुढे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांनी सत्तेत जाण्याच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे.”

आगामी निवडणुकीत वंचितला संधी देण्याचा निर्धार
या सभेमध्ये उपस्थित जनसमुदायाने आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या शिवाय पर्याय नाही, असा सूर लावत एक संधी वंचितला देऊन सत्ता मिळवण्याचा निर्धार केला.

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, राज्य सदस्य अमित भुईगळ, औरंगाबाद पूर्व जिल्हा निरीक्षक प्रभाकर बकेले, पूर्व जिल्हा अध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सिल्लोडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






