Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

mosami kewat by mosami kewat
February 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!
       

औरंगाबाद : औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय आणि छत्रपती महाविद्यालयाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनाधिकृतपणे शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारीची समाज कल्याण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोन्ही महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

शासनाच्या नियमानुसार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत असतानाही देवगिरी महाविद्यालयाकडून अनधिकृतपणे शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला होता. याविरोधात युवा आघाडीच्या वतीने समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. तसेच, नुकतेच देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य आंदोलनही करण्यात आले होते. (Vanchit bahujan aghadi)

विद्यार्थ्यांचा रोष आणि पुराव्यांची दखल घेत समाज कल्याण विभागाने महाविद्यालयाला आदेशित केले आहे की, यानंतर कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनाधिकृत शुल्क वसुली करू नये. अशी वसुली करणे ही शासन निर्णयाची (जीआर) पायमल्ली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाईल.

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचा इशारा

या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीचे पश्चिम शहर अध्यक्ष राहुल मकासरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर यापुढेही महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लूट थांबवली नाही, तर महाविद्यालयाला कुलूप ठोकले जाईल. तसेच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ (Atrocity Act) अंतर्गत संबंधित प्रशासनावर गुन्हा नोंदवण्यात येईल. 


       
Tags: aurangabadAurangabad college protestMaharashtraPoliticalstudentVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

Next Post

परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

Next Post
परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बातमी

पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

by mosami kewat
April 4, 2026
0

वसई-विरार : पोलीस ठाणे हे कायद्याचे आणि संविधानाचे केंद्र असून ते कोणत्याही विशिष्ट धर्माचे प्रार्थनास्थळ नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत...

Read moreDetails
गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर' आंदोलन

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

April 4, 2026
श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

April 4, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला

Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला

April 4, 2026
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home