Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला

mosami kewat by mosami kewat
April 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला
       
Gas Cylinder Shortage : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

११ मार्च रोजी ‘X’ (आधीचे ट्विटर) वर केलेल्या आपल्या वक्तव्यात त्यांनी इशारा दिला होता की, अमेरिका-इराण संघर्ष दीर्घकाळ चालल्यास आणि अशा मोठ्या संकटासाठी भारताची अपुरी तयारी यामुळे CNG वर अवलंबून असलेल्या उद्योगांवर गंभीर परिणाम होईल. त्यांनी म्हटले की, महिनाभरापूर्वी केलेला इशारा आज प्रत्यक्षात उतरलेला दिसत आहे. (Prakash Ambedkar)

आंबेडकर यांनी पुढे आरोप केला की, ‘आत्मनिर्भर’च्या घोषणा करूनही देशांतर्गत गॅस साठवणूक व पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक गुंतवणूक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

सध्या निर्माण झालेल्या LPG तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून, घरगुती स्वयंपाक करणेही कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना लाकूड, कोळसा किंवा केरोसीनसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर करावा लागत आहे. सिलेंडरच्या काळ्या बाजारातील दर वाढल्याने आर्थिक ताणही वाढला आहे. (Prakash Ambedkar)

याशिवाय, इंधनावर अवलंबून असलेले छोटे हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक उद्योग यांनाही मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी व्यवसाय बंद पडल्याने रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “मोदी स्वतः अमेरिकेसमोर झुकले आहेत, पण भारतातील मध्यमवर्ग आणि गरीबांना का त्रास देत आहेत? नरेंद्र, सिलेंडर कधी मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Prakash Ambedkar)

दरम्यान, देशातील वाढत्या गॅस टंचाईच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Tags: americabjpDonald TrumpGas AgencyGas cylinderGas Cylinder ShortageGas DistributionGas SupplyMaharashtramumbainarendra modiPoliticalrssVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

Next Post

श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

Next Post
श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home