Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

mosami kewat by mosami kewat
February 21, 2026
in बातमी, सामाजिक
0
धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर
       
नागपूर : नागपूरमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे प्रश्नपत्रिके परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर येथील सदर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपवर खासगी गट तयार करून प्रश्नपत्रिका शेअर केल्याचा संशय पोलिसांना होता. गुरुवारी झालेल्या केमिस्ट्रीच्या पेपरपूर्वीच संबंधित प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या गटावर प्रसारित झाल्याचे तपासात उघड झाले. हा प्रकार सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्र येथे समोर आला.

परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीने वारंवार प्रसाधनगृहात जाण्यामुळे केंद्रातील निरीक्षकांना संशय आला. तपासणीदरम्यान तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला. मोबाईल तपासल्यावर व्हॉट्सअॅप गटात परीक्षेच्या तासाभरापूर्वी प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

केंद्रप्रमुखांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पुढील चौकशीत १५ विद्यार्थ्यांचा गट तयार करून पेपर शेअर केल्याचे निष्पन्न झाले.  मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपवर १५ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थिनीची चौकशी केली असता खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित १३ विद्यार्थी शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा देत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण क्षेत्रातील या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags: ExamNagpur HSC Exampaperschoolstudent
Previous Post

मोदी ‘ब्लॅकमेल’ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा खळबळजनक आरोप; प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्वाची मागणी

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
बातमी

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

by mosami kewat
June 5, 2026
0

अकोला : काटीपाटी बॅरेज संग्रहाक प्रकल्पामुळे शेती बाधित झालेल्या रोहणा येथील मातंग समाजातील तायडे कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे...

Read moreDetails
धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

June 4, 2026
वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

June 4, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'VBA सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

June 4, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

June 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home