Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

mosami kewat by mosami kewat
April 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर' आंदोलन

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर' आंदोलन

नागपूर : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नागपुरात मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी नागपूर जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक रविभवन सभागृह येथे पार पडली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संविधान चौक नागपूर येथे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवणार आहेत. (Gas Price Hike)

Also Read : श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

या बैठकीचे अध्यक्षपद जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी भूषवले, तर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी आंदोलनाच्या रूपरेषेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रविभवन येथील या बैठकीला मंचावर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष महानंदाताई राऊत, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके, महासचिव राहुल दहिकर, मनोज सुटे, सी. सी. वासे आणि साधनाताई नितनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनाची रणनीती ठरवताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

बैठकीला जिल्हा आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी आनंद चौरे, वैभव येवले, शुभम वाहने, पवन तागडे, जय चरडे, हरिदास गवई, सुदेश धनवीज, हरीश नारनवरे, मिलिंद मेश्राम, किरण देवरे, शिशुपाल देशभ्रतार, बबन वनकर, किशोर धोटे, विजय गोंडूळे, वसंत मडके, अनिल गणवीर, अनिकेत गणवीर, मिलिंद पकिड्डे, बजरंग वानखेडे व विनोद मोहोड उपस्थित होते. (Gas Price Hike)

Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला

गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी संविधान चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Tags: Ambedkarite movementCost Of LivingCylinder PriceEconomic IssuesFuel Price HikeGas cylinderGas Price HikeInflation CrisisLPG Price RiseNagpur protestPrice riseProtestIn NagpurPublic ProtestVBA protest
Previous Post

श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

Next Post

पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home