स्वयंसेवक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा!
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) सज्ज झाली आहे.
आघाडीच्या वतीने चैत्यभूमी परिसरात स्वयंसेवक (Volunteers) तैनात करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवक नोंदणी अर्ज (Registration Form) प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या नागरिकांना या राष्ट्रीय कार्यात स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊन सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
जे नागरिक यात सहभागी झालेले असतील त्यांना ओळखपत्र (Identity Card) देण्यात देण्यात येईल, तसेच विविध गट तयार करून त्यांना चैत्यभूमीतील वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवली जाईल.
नोंदणी अर्ज व महत्त्वाची माहिती:
अर्जाची लिंक (Google Form) : https://forms.gle/vnGTHsrcYAUurnDk7
स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
१) नोंदणीनंतर स्वयंसेवकांनी आपले ओळखपत्र आणि २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे.
२) पक्षाकडून देण्यात येणारे हे ओळखपत्र केवळ स्वयंसेवकाचे ओळखपत्र असेल. याचा उपयोग चैत्यभूमीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी करता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
३) अंतिम मुदत: अर्ज दिनांक १ डिसेंबर २०२५ च्या आगोदर भरणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा:
स्नेहल सोहनी – 9967632547
स्वप्नील जवळगेकर – 8286258933
रोनक जाधव – 8286439372
कमलेश उबाळे – 9768276400






