Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

भांडवलशाही स्वतःची कबर स्वतः खोदते

mosami kewat by mosami kewat
November 6, 2025
in अर्थ विषयक
0
भांडवलशाही स्वतःची कबर स्वतः खोदते

भांडवलशाही स्वतःची कबर स्वतः खोदते

       

संजीव चांदोरकर

अमेरिकेत काल झालेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक उमेदवार निर्णायक मताधिक्याने विजयी झाले. पण इतर सर्व उमेदवारांच्या तुलनेत जगभर चर्चा कोणाची होत असेल तर न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेल्या जोहरान ममदानी यांची.

त्याला कारण आहे त्यांनी संपूर्ण प्रचारात निःसंदिग्धपणे पर्यायी समाजवादी मांडणी. जी जगातील भारतसाकट अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाना लागू पडते.

ज्यातून गेली जवळपास ४० वर्षे ब्रेनवॉश केल्या गेलेल्या कॉर्पोरेट वित्त भांडवल धार्जिण्या आर्थिक तत्त्वज्ञानाला भविष्यात आव्हान मिळू शकते. म्हणून ममदानी जगभर दखलपात्र झाले आहेत.

ममदानी यांच्या आर्थिक कार्यक्रमाला तरुण, कामगार, गरीब निम्न मध्यमवर्गीयांच्या तयार झालेल्या पाठिंब्याची पायाभरणी भांडवलशाहीनेच केलेली आहे. कशी ते बघूया

१. कुटुंबाच्या किमान राहणीमानासाठी अनेक अनेक वस्तूमाल / सेवा लागतात. त्यात अत्यावश्यक आणि ऑप्शनल असा फरक असतो. घरे, वीज, पाणी, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सामाजिक सुविधा अत्यावश्यक सदरात मोडतात.

पण अमर्याद नफा कमावण्याच्या आणि प्रसरण पावण्याच्या आपल्या गुणधर्मामुळे, भांडवलशाही सर्वच वस्तुमाल/ सेवांचे कमोडिफिकेशन करू पाहते. अत्यावश्यक व ऑप्शनल यात फरक करत नाही.

भारतासारख्या देशात तर अनेक कारणामुळे शेती क्षेत्राला निराळी वागणूक देणे गरजेचे आहे. पण त्याच देखील कॉर्पोरेट भांडवल घुसू पाहत आहे. त्याच्या प्रतिक्रिया येणारच होत्या.

२. नफेखोर भांडवलशाही असा फरक करायला नकार देऊन थांबत नाही तर अत्यावश्यक वस्तुमाल / सेवांचे दर / किमती बाजारधिष्टीत असतील असा आग्रह धरते. अशा वस्तूमाल / सेवा बाजारभावाने विकत घेण्यासाठी नागरिकांकडे पुरेशी क्रयशक्ती असावी लागते. जी क्रयशक्ती पुरेसे रोजगार व पुरेशा वेतनातूनच येऊ शकते.

पण भांडवलशाही अशी क्रयशक्ती तयार करण्याची जबाबदारी आपली नाही अशी भूमिका घेते. तंत्रज्ञान विकास एक स्वयंभू शक्ती बनते त्याचा रोजगारावर विपरीत परिणाम होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर क्लासिक उदाहरण आहे. आणि जास्तीत जास्त नफ्यासाठी वेतन पातळी दाबली जाते. ट्रेड युनियनची मुस्कटदाबी केली जाते.

परिणामी अर्थव्यवस्थेत क्रयशक्ती तयारच होत नाही. त्यातून ममदानी यांची Affordability घोषणा तयार झाली आणि जनतेला अपील झाली.

३. गेल्या ४० वर्षाच्या नवउदारमतवादी आर्थिक धोरणांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे विविध प्रकारच्या मत्ताची मार्केट्स (ॲसेट मार्केट्स) तयार झाली. रोखे, शेअर्स, कमोडिटी, क्रिप्टो, रियल इस्टेट इत्यादी. सबंधित रेग्युलेटरी फ्रेम खिळखिळी करून, जनतेच्या पैशावरील बँकिंग, भांडवल बाजारातून भांडवल उभारणी करून, या मार्केटमधील सट्टेबाज सदृश्य व्यवहारातून प्रत्येक देशातील प्रस्थापित वर्गाने तूफान माया जमा केली.

प्रत्येक देशात आधीच असलेली आर्थिक विषमता अधिक धारदार झाली. जाहिराती, टीव्ही, मिडिया यामुळे श्रीमंत लोक नक्की किती आणि कशाचा उपभोग घेतात हे कोट्यावधी सामान्य नागरिकांच्या, विशेषतः त्यांच्या कुटुंबातील तरुण पिढीच्या लक्षात येऊ लागले. मनात तुलना होऊ लागली. असंतोष फक्त दारिद्र्य आणि वंचितावस्थेमुळे तयार होत नसतो. टोकाच्या आर्थिक विषमतेतून होणाऱ्या मनातील तुलनेमुळे तयार होणारा असंतोष शेकडो पटींनी ज्वलनशील असतो. तो आता सर्वत्र उफाळून येत आहे.

जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीचे हे तीनच अंतर्विरोध नाही आहेत. इतरही बरेच आहेत. “आपली कबर स्वतः खोदते” हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत.

न्यूयॉर्क मध्ये सुरू झालेले हे लोण थांबणारे नाही. वेळ लागेल. पण दिशा अपरिवर्तनीय असेल.

कारण ममदानी यांच्या कॉन्स्टिट्यून्सीची मशागत खुद्द भांडवलशाही करत राहणार आहे. ती प्रणाली बुद्धीने बुद्धू नाही. पण तिच्यामध्ये सुसाईडल टेंडेन्सिज आहेत!

याचा अर्थ पर्यायी जनकेंद्री आर्थिक व्यवस्था आपोआप उभ्या राहतील असे देखील नाही. हे दोन भिन्न विषय आहेत. पर्यायी समाजवादी मॉडेल्स साठी अनुकूल परिस्थिती भांडवलशाही तयार करते एवढाच त्याचा अर्थ. खरेतर आपोआप काहीच घडत नसते. Ball is in our court.


       
Tags: CapitalismCapitalismCrisisEconomicJusticeInequalityNeoliberalismCollapseNewYorkPoliticsSocialistSocialistWaveVanchit Bahujan AaghadivbaforindiaZoharaMamdani
Previous Post

रुपाली चाकणकर यांच्या ‘स्त्रीविरोधी’ विधानावरून वंचित आक्रमक ; उद्या मंत्रालयासमोर ‘निषेध मोर्चा’!

Next Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे चैत्यभूमी येथे ‘महापरिनिर्वाण दिना’साठी स्वयंसेवक नोंदणी आवाहन

Next Post
वंचित बहुजन आघाडीतर्फे चैत्यभूमी येथे 'महापरिनिर्वाण दिना'साठी स्वयंसेवक नोंदणी आवाहन

वंचित बहुजन आघाडीतर्फे चैत्यभूमी येथे 'महापरिनिर्वाण दिना'साठी स्वयंसेवक नोंदणी आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
August 25, 2026
0

धुळे : धुके जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहाशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळे येथील...

Read moreDetails
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

August 25, 2026
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

August 24, 2026
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home