औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य समितीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या २४ ऑक्टोबर २०२५ रोजी औरंगाबाद शहरात हा मोर्चा काढण्यात येणार असून, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समितीचे सर्व पदाधिकारी यात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
वेळ आणि स्थळ –
सदर मोर्चा 24 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून सुरू होईल. क्रांती चौकातून निघून हा मोर्चा आरएसएसच्या कार्यालयाजवळ (बाबा पेट्रोल पंप जवळ, औरंगाबाद) समाप्त होईल.
अयोध्याच्या दीपोत्सवानंतरचे विदारक चित्र: दिव्यांतील उरलेले तेल गरिबांच्या वाट्याला; विश्वविक्रमाच्या झगमगाटावर टीकेची झाळ
आर.एस.एस.च्या माध्यमातून पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे कटीकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात हा ‘जन आक्रोश मोर्चा’ आयोजित केल्याचे सांगितले आहे.