Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव-खेड्यांमध्ये वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी तातडीने जाहीर प्रकटन काढावे, तसेच वर्षानुवर्षे इतर दुकानांना संलग्न ठेवण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे स्वतंत्रपणे वाटप करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात लोकसंख्या वाढलेल्या काही मोजक्याच ठिकाणांसाठी नवीन स्वस्त धान्य दुकानांचे जाहीर प्रकटन काढण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांची लोकसंख्या विचारात घेता अनेक ठिकाणी नवीन स्वस्त धान्य दुकानांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पात्र गावांसाठी नवीन स्वस्त धान्य दुकानांचे जाहीर प्रकटन काढण्यात यावे.

तसेच जिल्ह्यात अनेक स्वस्त धान्य दुकाने विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे इतर दुकानांना संलग्न ठेवण्यात आली आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असून पुरवठा व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा सर्व संलग्न दुकानांचे स्वतंत्र जाहीर प्रकटन काढून नियमानुसार नवीन परवानाधारकांना दुकाने वाटप करण्यात यावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पूर्व जिल्हा महासचिव सूरज पाटील मूळे, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा संघटक रवी रत्नपारखे, जिल्हा सचिव उमेश सरदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: aurangabadMaharashtraRation shopVanchit Bahujan Aghadiऔरंगाबाद
Previous Post

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

Next Post

हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

Next Post
हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home