मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, RSS आणि BJP संविधान बदलण्याची घोषणा करत असतात आणि ते वैदिक संविधान निर्माण करून येथे वैदिक व्यवस्था आणू इच्छित आहेत. ज्यात बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य असणार नाही. मात्र, या संविधानाच्या माध्यमातून वंचितांना, उपेक्षितांना, ओबीसींना प्रतिनिधित्व मिळते म्हणून आम्ही या संविधानाच्या बाजूने आहोत.
आताचे संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आहे. हे लोकांचं संविधान आहे, ते टिकवणं आपली जबाबदारी आहे. असेही ॲड.आंबेडकरांनी म्हटले आहे.