अकोला, दि. – २० अकोला लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांना विजयी करण्यासाठी वंचित पदाधिका-यानी आज अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष ह्यांचे निवास्थानी रोडमॅप तयार केला असून कुठल्याही परिस्थिती मध्ये विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर आज वंचितच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. संयुक्तरीत्या संघटना बांधणी, मोर्चे आंदोलन आणि निवडणुक यंत्रणा उभी करण्या साठी आज पासून निवडणुकी पर्यंत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.मुंबई येथील संविधान सन्मान महासभा होताच जिल्हा आणि शहरभर पक्षाच्या कार्यक्रमाचा धडाका लावण्यात येणार आहे.त्याची माहिती आजच्या बैठकीत त्याची उपाययोजना सादर करण्यात आली ह्या पुढे पक्षात एकदिलाने काम करण्याची हमी देवून पक्षात कुणालाही गटबाजी किंवा मतभेद ह्यांना थारा देऊ नका, असे आवाहन देखील करण्यात आले.
बैठकीला ह्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवा महासचिव तथा प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाठ, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव मिलींद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रभाताई सिरसाठ, महिला आघाडी महासचिव शोभाताई शेळके, ज्येष्ठ नेत्या पुषपाताई इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढावू,एड संतोष रहाटे, गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, भारिप बहुजन महासंघाचे महासचिव दिपक गवई, प्रतिभाताई अवचार प्रामुख्याने उपस्थित होते.