Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-2027 चा अर्थसंकल्प सादर केला

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in अर्थ विषयक, बातमी
0
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-2027 चा अर्थसंकल्प सादर केला
       

Maharashtra Budget 2026 : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केले. महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-2027 चा अर्थसंकल्प मांडला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.

१.महात्मा फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एक समिती स्थापन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतील.

२. संत गाडगेबाबांचं 150 वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार.

३. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.

४. २०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

५. बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल.

६. संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जतन आणि संवर्धन करू.

७. 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राकडून भरीव निधी प्राप्त होणार आहे. सहाव्या वित्त आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली होती. त्यांचा अहवाल राज्यपालांच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल.

८. 1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल.

९. बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल.

१०. संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, कुक्कुटपालकांसाठी विशेष योजना करण्यात येणार आहे. 1 कोटीची मुख्यमंत्री मत्स्य योजना करण्यात येत आहे.

११. १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल

१२. २०४७ पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे. ३२ हजार ७५६ कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च यावर्षी देखील २० हजार कोटींची तरतूद केली आहे

१३. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे

१४. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे

१५. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमीचे रस्ते तसेच पुलांची कामे हाती घेतली जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.


       
Tags: EconomicsMaharashtraMaharashtra Budget 2026Political
Previous Post

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

Next Post

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: आकड्यांची आतिषबाजी की वास्तवाचा दुष्काळ?

Next Post
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: आकड्यांची आतिषबाजी की वास्तवाचा दुष्काळ?

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: आकड्यांची आतिषबाजी की वास्तवाचा दुष्काळ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?
बातमी

लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?

by mosami kewat
May 26, 2026
0

NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे परिणाम आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव...

Read moreDetails
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

May 26, 2026
तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

May 26, 2026
मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

May 26, 2026
४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

May 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home