Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

mosami kewat by mosami kewat
March 13, 2026
in अर्थ विषयक
0
भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

– संजीव चांदोरकर

” एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया यांच्यामध्ये जागतिक पटावर भू राजनैतिक / आर्थिक / लष्करी बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ सुरू आहे…. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्याकडे त्या खेळातील एक चाल म्हणून बघावयास हवे “

Kenneth Rogoff, Ex Chief Economic Adviser, IMF (Economic Times, March १३, २०२६, पान क्रमांक ५)

चीनच्या उभरत्या महासत्तेला कशी वेसण घालायची याबद्दल अमेरिकेत गेली अनेक वर्षे मंथन सुरू आहे, एक राष्ट्र म्हणून. याचा अर्थ असा की रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोघांचे अमेरिकेने “चीनला वेसण घातली पाहिजे” या अजेंड्यावर एकमत आहे. कारण अमेरिकेच्या प्रभुत्वस्थानाला आव्हान देण्याची आपली कुवत चीन वाढवत आहे.

लक्षात ठेवूया की अमेरिकेत औद्योगिक आणि वित्त कॉर्पोरेट, लष्कर आणि सीआयए सारख्या संस्था एक दीर्घकालीन अजेंडा राबवत असतात. दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष बदलला, सत्ताधारी पक्ष बदलला तरी त्या अजेंड्याचा धागा तुटत नाही.

गेली अनेक वर्षे चीनने इराणमध्ये राजकीय आणि भांडवलाची बरीच गुंतवणूक केली आहे. त्याच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पात इराणला ओवून घेण्यात आले आहे. अमेरिकेच्या आखाती देशातील प्रभुत्वाला शह देण्यासाठी चीन इराणला जवळ करत आला आहे. अमेरिका मध्यपूर्वेतील आयात तेलावर अवलंबून नाही, चीन मोठ्या प्रमाणावर आहे. युद्ध जेवढे लांबेल तेवढे ते चीन सकट अधिकाधिक देशांना त्यात ओढून घेऊ शकते.

या व अशा अंतरदृष्टिमुळे जे काही घडत आहे त्याचे विश्लेषण ट्रम्प केंद्री किंवा व्यक्ती केंद्री पणाच्या पलीकडे नेण्यास मदत होते.

Tags: ChinaGeopoliticsGlobalConflictGlobalPoliticsGlobalPowerStruggleGlobalSecurityIranMiddleEastPoliticalAnalysisRussiaStrategicRivalryUSAWorldEconomyWorldPower
Previous Post

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

Next Post

बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मोदी हटाव, देश बचाव घोषणेसह रस्ता रोको आंदोलन

Next Post
बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मोदी हटाव, देश बचाव घोषणेसह रस्ता रोको आंदोलन

बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मोदी हटाव, देश बचाव घोषणेसह रस्ता रोको आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन
बातमी

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

by mosami kewat
April 2, 2026
0

औरंगाबाद : शहरातील सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र...

Read moreDetails
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 2, 2026
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home