Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

mosami kewat by mosami kewat
April 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

       

Gas Cylinder Shortage : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांवर बसत आहे. वाढती किंमत आणि बुकिंग कालावधीतील वाढ यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत एक दुर्दैवी अपघाताची घटना तिवसा तालुक्यात उघडकीस आली आहे. (Gas Cylinder Shortage)

टाकरखेडा पूर्णा येथील अंकुश पांडुरंग अमझरे (वय २७) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना सार्सी–तिवसा मार्गावर सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता घडली. मात्र, त्यांचा मृतदेह दोन दिवसांनंतर बुधवारी आढळून आला.

Also Read : सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हे रिकामे गॅस सिलिंडर घेऊन भारसवाडा येथील आपल्या जावयाकडे जात होते. त्यांच्या जावयाकडे गॅस एजन्सी असल्याने ते सिलिंडर भरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, प्रवासात त्यांचा मोबाईल हरवला. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. (Gas Cylinder Shortage)

यानंतर एका वळणावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी घसरल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांना ते जावयाकडे पोहोचल्याचा समज करून घेतला होता. मात्र, संपर्क न झाल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुधवारी जंगलातून जात असलेल्या नागरिकांना रस्त्यालगतच्या खड्यात दुचाकीसह त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. (Gas Cylinder Shortage)

Also Read : तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

दरम्यान, राज्यात गॅस सिलिंडर टंचाई नसल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी विविध भागांतून टंचाई आणि वाढत्या दरांबाबत तक्रारी समोर येत आहेत. अकोला येथेही घरगुती गॅस समस्येमुळे एका माजी सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने गॅस पुरवठा आणि दरवाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


       
Tags: Accident AwarenessAkolaConsumer ConcernsDomestic Gas CrisisEmergency ResponseGas Cylinder ShortageGas Supply IssuesPublic safetyRising PricesTivsaTragic AccidentVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

Next Post

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

Next Post
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका
बातमी

फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका

by mosami kewat
June 22, 2026
0

मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत...

Read moreDetails
रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

June 22, 2026
इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

June 22, 2026
जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

June 22, 2026
FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

June 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home