उज्जैन: मध्यप्रदेश येथील उज्जैनमध्ये काल एक अमानवीय घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. त्या नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटल्यावर रक्तस्त्राव चालू असताना, ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत मदतीची याचना करत होती. लोकांनी बघ्याची भूमिका घेत त्यावर काहीच मदत न केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आपला समाज सध्या अमानवीय झाला आहे! समाजाने इथल्या स्त्रीवर दोनदा आघात केले. एक, जेव्हा तिचे लैंगिक शोषण झाले आणि मांसाच्या तुकड्यासारखे फेकले गेले आणि दुसरं, जेव्हा ती एका दारातून दुसऱ्या दारात गेली तेव्हा लोकांनी तिला हाकलून दिले. रक्तस्त्राव चालू असतांना, ती अर्धनग्न अवस्थेत, ती मदतीची याचना करत होती. त्या १२ वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर ह्या वर्तनाचा किती आघात झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. दोषी फक्त भाजपशासित सरकार नाही, तर इथली जनता आहे. ज्याने ती मदत मागत असतांना तिला मदतीचा हात नाकारला. या घटनेवर आपला समाज हा अमानवीय झाला आहे. असे ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी समजाची यावरील भूमिका आणि भाजप सरकारमध्ये घडलेल्या या क्रूर घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1707266972294246808?s=20