मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेला हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.
यावेळी बुरखा घालून आलेल्या हजारो स्त्रिया, मुस्लीम धर्मगुरू, मौलवी, मौलाना आणि मुस्लीम बांधव आझाद मैदानावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी एकवटला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या ठिकठिकाणी मोठ्या संख्येने सभा होत आहेत. समाजातील अनेक छोटे मोठे घटक सध्या वंचित बहुजन आघाडीला जोडल्या जात आहेत. त्यात एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असणारा मुस्लीम समाज सध्या वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होतांना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या भूमिकेवर मुस्लीम समाज निराश असल्याचे आजच्या संख्येने दाखवून दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे मुस्लीम समाज सध्या हक्काचं नेतृत्व म्हणून पाहत असल्याचे आंबेडकरांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभेच्या मुस्लिमांच्या गर्दीतून दिसत आहे. मुस्लीम समाजाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना पूर्णपणे नाकारले आहे, असे चित्र वंचित बहुजन आघाडीच्या सभांतून पुढे येत आहे.