Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 16, 2024
in Uncategorized
0
शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा
       
औरंगाबाद : दिल्ली येथे विविध राज्यांतून शेतकरी एकत्र येऊन न्याय पद्धतीने, लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असूनही केंद्र सरकार या बाबतीत उदासीन आहे. याविरोधात औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

कठीण परिश्रम घेऊन शेती पिकवून सर्वांचे पोट भरणारा शेतकरी उपाशी आहे. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ या सरकारने आणली असून, उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याचा सपाटा लावला आहे. या कृतीचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याची भूमिका वंचितने मांडली आहे. तसेच, त्यांना न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल रोको करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीने दिला आहे.

या वेळी  जिल्हा, शहर, कामगार आघाडी तसेच युवा राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईंगळ, मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बगले, योगेश बन, महिला जिल्हाध्यक्ष लताताई बामणे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड आणि कामगार आघाडी अध्यक्ष कडुबा जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: aurangabaddelhiFarmerfarmersprotestVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर

Next Post

भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

Next Post
भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home