Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितची भूमिका २६ तारखेला स्पष्ट करणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 23, 2024
in राजकीय
0
वंचितची भूमिका २६ तारखेला स्पष्ट करणार
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : शाहू महाराजांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा

मुंबई : आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका २६ मार्चला जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी दिली असून, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला चार जागा कधीच ऑफर करण्यात आल्या नाहीत. तीन ऑफर केल्या होत्या, त्यामध्ये एक अकोला होती. ती आम्ही त्यांना परत घ्यायला लावली. त्यामुळे आमच्याकडे दोनच जागा त्यांनी दिल्या होत्या. आम्ही जे म्हणतो, ते कोणीच ऐकून घेत नाहीत. मात्र, संजय राऊत जे म्हणतात, त्यावरच चर्चा होतात.

महाविकास आघाडीसोबत झालेल्या चर्चेमधूनच लक्षात आले की, यांच्यामध्ये पंधरा जागांवर भांडण आहे. त्यामुळे या पंधरा जागा तुम्ही फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेवर तुम्ही काय करणार, याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो झाल्यावरच आम्ही बोलू शकतो,
त्यामुळे आम्ही २६ पर्यंत थांबणार, त्यांच १५ जागांच कोडं उलगडलं की ठरवणार, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.   

आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचा प्रस्ताव दिला होता. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसने त्या सात जागा सांगाव्यात, असे म्हटले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व आमच्या पक्षाच्या वतीने केले जातील. मागच्यावेळी जे घडले ते या वेळी घडू नये याची दक्षता घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील तिढा मिटणार नसेल, तर आमची एन्ट्री करून काय उपयोग? आम्ही २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. आम्ही काँग्रेसला सात जागा कळवल्या आहेत. तसेच, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि नाना पटोले यांना पत्रही दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले हे एकाअर्थाने बरे झाले, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी बोलताना आंबेडकर यांनी म्हटले आहे की, कॅबिनेट डिसिजनला कोर्ट किंवा चौकशी एजन्सीही चौकशी करु शकत नाही. मात्र, याला मनी लाॅड्रींगचे रुप देण्यात आले आहे. यामुळे हे पक्षपातीपणा आणि राजकारणाची गोष्ट आहे. म्हणून सामान्य लोकांना माझं आवाहन आहे, आज केजरीवाल आहे. उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर या सरकारला बाहेर काढणं महत्वाचं असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: arvind kejariwalCongressmahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

केजरीवाल यांची अटक ही दडपशाही!

Next Post

‘वंचित’ चा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा !

Next Post
‘वंचित’ चा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा !

'वंचित' चा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
बातमी

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

by mosami kewat
November 19, 2025
0

बीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन पूर्ण ताकतीने लढत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025
उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

November 19, 2025
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home