मुंबई( ८ डिसेंबर): इस्राईलकडून पॅलेस्टाईन मधील गाझा येथे होत असलेले बॉम्ब हल्ले थांबावेत आणि तिथे शांती राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर सर्वधर्मीय शांती महासभेचे आयोजन करण्यात आले आले आहे.
इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षाकडे धर्माच्या चष्यम्यातून न पाहता मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. आंबेडकर यांनी मध्यंतरी म्हटले होते. मानवतावादासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले होते. याच पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय धर्मगुरूंना निमंत्रण देखील देण्यात आले.
या शांती महासभेला महाथेरो बी. संघपाल( बौद्ध, प्रतिनिधी), ह.भ. प शामसुंदर महाराज (हिंदू प्रतिनिधी ), फास्टर योहोशो कसबे( ख्रिचन प्रतिनिधी)आदी. बौद्ध, हिंदू, ख्रिचन आणि मुस्लीम मौलवी आणि मौलानांची उपस्थिती होती.