Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in राजकीय
0
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी  वंचितने सुचवला ठोस उपाय.
       

किमान समान कार्यक्रमात मांडला शेतकरी विकास आराखडा !

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या हा कर्जबाजारीपणाचा थेट परिणाम आहे. कर्जबाजारीपणा हा अनेक घटकांचा परिणाम आहे. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी, वीज आणि डिझेल यांसारख्या कृषी निविष्ठांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ नियंत्रणात आली पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडली आहे.
महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे.

कृषी संकट आणि कर्जातून मुक्तीसाठी…


विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष सत्वर पूर्ण करणे आवश्यक आहे. कृषी संकटांचे कारण म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अवलंबत असलेली नव-उदारवादी आर्थिक धोरणे हे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे. कृषी क्षेत्रातील या नव-उदारवादी धोरणातील बदलांचे काही ठळक पैलू आम्ही मांडले आहेत. ज्यात बदल आवश्यक आहेत कारण या धोरणांमुळेच कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणात भर पडली आहे, असे वंचितने महाविकास आघाडीला दिलेल्या मसुद्यात म्हटले आहे. कॉर्पोरेट्सना जमिनीचा मोठा भूभाग देण्यासाठी जमीन सुधारणांचे उलटसुलटीकरण रद्द करणे, खते आणि डिझेल यांसारख्या सर्व कृषी निविष्ठांवरील सबसिडी कमी न करणे, विदेशी कृषी आयातीवरील परिमाणात्मक निर्बंध हटवणे, कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासावरील सार्वजनिक खर्चात वाढ करणे, कृषी क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण, ज्यामुळे सर्व निविष्ठांच्या खर्चात मोठी वाढ होते. त्यावर सकारात्मक नियंत्रण ठेवणे, सिंचन आणि उर्जा प्रकल्पांचे 100% खाजगीकरण रद्द करणे, निर्यात-केंद्रित शेतीला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करणे आदी मुद्यांची चर्चा यात करण्यात आली आहे.

शेतक-यांच्या विकासासाठी सुचविला कार्यक्रम

  • एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी.
  • शेतकऱ्यांसाठी बँक आणि इतर संस्थात्मक कर्जाची कमतरता आहे त्यासाठी दीर्घकालीन व अल्प व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून द्यावे
  • दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पीक अपयशी ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विम्याच्या प्रभावी छत्राची उपलब्धता करून द्यावी.

       
Tags: CongressMaharashtramahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुण्यात होणार ‘वंचित’ ची सत्ता परिवर्तन महासभा !

Next Post

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

Next Post
असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद
Uncategorized

नांदेड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद

by mosami kewat
December 22, 2025
0

नांदेड : आगामी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, आज पार पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला उमेदवारांचा अभूतपूर्व...

Read moreDetails
मुंबई महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडी सज्ज, उमेदवारीसाठी इच्छुकांची दादरमध्ये तुफान गर्दी

औरंगाबाद मनपासाठी ‘वंचित’ सज्ज! उद्या क्रांती चौकात रंगणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका

December 22, 2025
निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘वंचित’ची जय्यत तयारी; मुंबईत मुलाखतींसाठी इच्छुकांची अलोट गर्दी

निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘वंचित’ची जय्यत तयारी; मुंबईत मुलाखतींसाठी इच्छुकांची अलोट गर्दी

December 22, 2025
वंचित घटकांबाबतीत जातीयवादी प्रस्थापित मिडीयाचा खरा चेहरा उघड !

वंचित घटकांबाबतीत जातीयवादी प्रस्थापित मिडीयाचा खरा चेहरा उघड !

December 22, 2025
राजकीय प्रचाराची ‘वंचित’ स्टाईल!नवदाम्पत्याला भेट दिले विजयाचे पोस्टर

राजकीय प्रचाराची ‘वंचित’ स्टाईल!नवदाम्पत्याला भेट दिले विजयाचे पोस्टर

December 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home