अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११३ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसह भारतीय बौद्ध महासभेचे कार्य देश-विदेशात पुढे नेण्यात भैय्यासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान होते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सचिव तथा जिल्हा समन्वयक माजी आमदार ऍड. नतिकुद्दीन खतीब साहेब हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे उपस्थित होते.
अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष कलीम खान पठाण, कार्याध्यक्ष हाजी मजहर साहब, पश्चिम शहर महासचिव गजानन गवई, पूर्व महासचिव मनोहर बनसोड, तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, आनंद डोंगरे, मनोहर वानखडे, डॉ. अशोक मेश्राम, रमेश सरकटे, वासिफ खान, निलेश वाहूरवाघ, शंकरराव इंगोले, सुरेश कलोरे, नितीन सपकाळ,
पराग गवई, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे, संजय किर्तक, सुरेंद्र सोळंके, बंटी बागडे, निलेश लोणागरे, डॉ. राजुस्कर, संतोष कीर्तक, सचिन तेलगोटे, सुयोग आठवले इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मनोहर बनसोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश कलोरे यांनी केले.






