Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले

mosami kewat by mosami kewat
March 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले
       
औरंगाबाद : भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला.

२ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. तसेच नरेंद्र मोदी यांचा जेफ्री एपस्टीनशी काय संबंध आहे, अमेरिकेसोबत देशविरोधी करार का केले जात आहेत, फ्रान्ससोबत राफेल करार का करण्यात आला, तसेच भारताची विदेश नीती अमेरिकेच्या दबावाखाली ठरवली जात आहे का, असे प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केले होते. (Aurangabad protest)

या प्रश्नांची उत्तरे अद्याप नरेंद्र मोदी यांनी दिलेली नाहीत. दरम्यान, मोदींना प्रश्न विचारल्यामुळे भाजपचे अमर साबळे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे आंदोलन करून साबळे यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. (Aurangabad protest )

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा आघाडी पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, महिला आघाडी अध्यक्ष साधना पठारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: aurangabadAurangabad protestbjpEpstein filenarendra modipmVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

Next Post

UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

Next Post
UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home