अकोला : वंचित बहुजन युवा आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर (यशवंतराव आंबेडकर) यांची जयंती शासकीय विश्रामगृह, अकोला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे हे होते, तर जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले कार्य तसेच धम्म चळवळीसाठी दिलेले मोलाचे योगदान याविषयी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. त्यांच्या कार्याची आठवण करून देताना त्यांना ‘सूर्यपुत्र’ म्हणून आदराने संबोधण्यात आले.
यावेळी महानगर अध्यक्ष वैभव खडसे, अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, पातूर तालुका अध्यक्ष सम्राट तायडे, बाळापूर तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे, अकोट तालुका अध्यक्ष आशिष रायबोले, माजी महानगर अध्यक्ष जय तायडे, नितीन वानखडे, राजेश दारोकर, नागेश उमाळे (शहर प्रसिद्धी प्रमुख), आकाश जंजाळ (अकोला प्रसिद्धी प्रमुख), सूरज दामोदर (मीडिया प्रमुख) यांच्यासह साहिल बोदडे, सचिन शिराळे, प्रदीप इंगळे, रोशन डोंगरे, अमोल शिरसाट, बंटी बागडे, नौशाद, रणजित शिरसाट, स्वप्नील वानखेडे, शुभम साऊथकर, सचिन सरकटे, आनंद शिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






