Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश

mosami kewat by mosami kewat
February 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश
       

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी निवडणुकांपूर्वी जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना केवळ मोफत सुविधा देण्याऐवजी त्यांच्या जीवनमानात दीर्घकालीन सुधारणा घडवणाऱ्या, रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या ठोस धोरणांची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर तमिळनाडू पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या याचिकेवर (दि.१९) सुनावणी सुरू असताना ही निरीक्षणे नोंदवण्यात आली. (Supreme Court)

सरन्यायाधीशांनी तोंडी निरीक्षणात म्हटले की, कल्याणकारी योजना राबवणे हे राज्याचे कर्तव्य असले तरी आर्थिक शिस्त पाळणेही तितकेच आवश्यक आहे. “मोफत वस्तू वाटण्यापेक्षा लोकांना रोजगार कसा मिळेल, याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

फरक न करता सुविधा देणे योग्य का?

न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की, वीज बिल भरण्याची क्षमता असलेले आणि नसलेले यांच्यात भेद न करता मोफत सुविधा देणे योग्य आहे का? अशा योजनांमुळे राज्यांच्या अर्थकारणावर ताण येत असून, दीर्घकालीन विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. (Supreme Court)

थेट रोख हस्तांतरणावरही सवाल

काही राज्यांत निवडणुकांपूर्वी जाहीर होणाऱ्या थेट रोख हस्तांतरण (Direct Cash Transfer) योजनांचाही उल्लेख करत खंडपीठाने विचारले, जर नागरिकांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाणार असतील, तर लोकांनी काम का करावे? राष्ट्रनिर्मितीसाठी स्वाभिमान आणि रोजगारनिर्मिती अत्यावश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. (Supreme Court)

न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांनी स्पष्ट केले की, हा मुद्दा एका राज्यापुरता मर्यादित नाही. अनेक राज्ये आर्थिक तुटीत असतानाही मोफत योजनांचा विस्तार करत आहेत. अर्थसंकल्पात बेरोजगारी निवारणासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक तरतूद का केली जात नाही, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. राज्यांच्या वार्षिक महसुलातील किमान २५ टक्के निधी विकासासाठी वापरण्याबाबत स्पष्ट धोरण असावे, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले. निवडणूक घोषणांपेक्षा दीर्घकालीन विकास आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचा संदेश न्यायालयाने दिला.


       
Tags: ElectiongovernmentJusticeNew Delhipeoplesuprem courtVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन

Next Post

बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

Next Post
बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप
बातमी

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

by mosami kewat
March 12, 2026
0

सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर...

Read moreDetails
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home