Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

mosami kewat by mosami kewat
April 1, 2026
in बातमी, सामाजिक
0
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : आखाती प्रदेशातील सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता भारतातील गॅस बाजारावर दिसू लागला आहे. एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे. अशातच व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे.

१ एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या दरांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायिकांसाठी ही सकाळ चिंतेची ठरली आहे. १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे १९५ ते २१८ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या व्यवसायांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. (LPG Gas Price Hike)

Also Read : नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये कमर्शियल सिलिंडर २०७८.५० रुपयांवर पोहोचला आहे, जो यापूर्वी १८८४.५० रुपये होता. कोलकात्यात हा दर २२०८ रुपये, चेन्नईत २२४६.५० रुपये आणि मुंबईत २०३१ रुपये इतका झाला आहे. याशिवाय पाटणा आणि जयपूरमध्येही दरांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

ही वाढ एका महिन्यातील दुसरी मोठी वाढ आहे. १ मार्च रोजीही कमर्शियल सिलिंडरच्या दरात ११४.५० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे छोट्या दुकानदारांपासून मोठ्या हॉटेल व्यवसायिकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (LPG Gas Price Hike)

Also Read : Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

दरम्यान, घरगुती ग्राहकांसाठी काहीसा दिलासा कायम आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७ मार्च रोजी ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर सध्या दिल्लीमध्ये हा सिलिंडर ९१३ रुपयांवर स्थिर आहे. (LPG Gas Price Hike)

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि चलनवाढीचा आढावा घेऊन एलपीजीचे दर निश्चित करतात. त्यामुळे जागतिक घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत गॅसच्या किंमतींवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags: Business ImpactCommercial LPGCost Of LivingEconomic NewsEnergy CrisisFuel Price RiseGas Cylinder PriceInflation ImpactLPG Price HikeMarket UpdateOil PricesPrice HikeRestaurant Costs
Previous Post

नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

Next Post

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

Next Post
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home