Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

mosami kewat by mosami kewat
March 31, 2026
in बातमी, राजकीय
0
Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी
       
जालना : शहरातील अंबड चौफुली, मंठा बायपास रोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (३० मार्च) विशेष ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. बोरगाव (ता. जि. जालना) ग्रामपंचायत आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दरबारात घरकुल योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात आले. (Housing Scheme)

अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती –

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जालना पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे गृहनिर्माण अभियंता खाजा आसीफ शेख यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी समजून घेतल्या.

रखडलेले हप्ते तात्काळ जमा होणार –

पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना आणि इतर विविध शासकीय घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Housing Scheme)

या प्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुका महासचिव वैभव वानखेडे, वैजनाथ डोके, उत्तम खरात, वर्षा बाबासाहेब डोके, आनंद लोंढे, सचिन लोंढे, राहुल डोके, संजय डोके, किरण डोके, गौतम पाडमुख, शत्रुघ्न कोळी, रोशन सदावर्ते, गणेश वाहुळे, दत्ता काकडे यांच्यासह बोरगाव परिसरातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Housing schemeMaharashtraPMAYPoliticalVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Next Post

नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

Next Post
नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home