Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

mosami kewat by mosami kewat
April 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन
       
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला घरगुती गॅस आणि व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा आता जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या ६ एप्रिल रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आज मुंबईतील पत्रकार परिषदेत करण्यात आली.

बुधवारी १ एप्रिल रोजी मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मुंबई महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, आणि युवक मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर खरात उपस्थित होते. (Maharashtra LPG Shortage)

या आंदोलनांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी (फोकस पॉईंटवर) कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन रस्त्यावर चुली मांडणार आहेत. तिथेच अन्न शिजवून ते अन्न आणि निवेदन घेऊन जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना देण्यात येईल. गॅसअभावी जनतेला पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, हे या आंदोलनातून सरकारला दाखवून दिले जाणार आहे.

‘हा केवळ मध्यमवर्गीयांचा प्रश्न नाही’

गॅस टंचाईचा फटका केवळ शहरांनाच नाही, तर ग्रामीण भागातील जनतेलाही बसत आहे. आज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकर आणि इलेक्ट्रिक प्लेट्स मिळेनाशा झाल्या आहेत. हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्सचे मोठे नुकसान होत असून, अनेक ठिकाणी गॅसअभावी लग्नसोहळे पुढे ढकलावे लागत आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. (Maharashtra LPG Shortage)

या पत्रकार परिषदेत मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एकीकडे सर्वसामान्य एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील लोकांना २५-२५ दिवस गॅससाठी वेटिंगवर राहावे लागते, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या वशिल्याने ठराविक धनदांडग्यांच्या घरी गॅस सहज पोहोचवला जातो. भाजपची ही दुहेरी आणि जातीवादी भूमिका आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. ६ एप्रिल रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्वसामान्य जनता, छोटे व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Tags: Gas cylinderIran israel america warMaharashtraMaharashtra LPG Shortagenarendra modiPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

Next Post

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home