Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रचाराच्या धामधुमीत सुजात आंबेडकर बेशुद्ध !

प्रबुद्ध भारत by प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in बातमी
0
       

सुजात आंबेडकर :सर्वांनी जिद्दीने कामाला लागा, जिंकत आलेली लढाई आपल्याला हरायची नाही.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी ते प्रचार दौरे करत आहेत. अशातच प्रचाराच्या सततच्या मालिकेनंतर सुजात आंबेडकर हे अचानक बेशुद्ध झाले. अकोल्यातील कडक उन्हाळा आणि त्यात सततची पायपीट यामुळे ते बेशुद्ध झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आंबेडकर यांना सध्या वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे. डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस विश्रांतीचा कडक सल्ला दिला आहे,  तरी देखील या सल्ल्याला न जुमानता ते शहरातील एका बैठकीत सहभागी झाले होते.

उपचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांना 3 लिटर सलाईन देण्यात आले. यामुळे सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या प्रचाराचे कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले आहेत.

सर्वांनी जिद्दीने कामाला लागा; जिंकत आलेली लढाई आपल्याला हारायची नाही – सुजात आंबेडकर

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांनी आपल्या प्रकृतीची माहिती देत म्हटले आहे की, दोन दिवसांपासून माझी तब्येत ठीक नसल्याने मला सलाईन चढवण्यात आल्या आहेत. पण सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, काळजी करायची काहीच गरज नाही. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांनी दोन दिवसांची विश्रांती घ्यायला लावली होती. पण आपण काम थांबवू नका, जिद्दीने काम करायला लागा. मला जरी विश्रांती करायला लावली असेल तरी मी 14 एप्रिल भिमजयंतीपासून पुन्हा जोरदार कामाला लागणार आहे.

प्रचारात आपण मागे हटण्याची गरज नाही. जिंकत आलेली लढाई आपल्याला हारायची नाही. सर्वांनी जिद्दीने कामाला लागा. असा त्यांनी व्हिडीओ संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतचे वातावरण होते मात्र, आपण खचून जाऊ नका, मी लवकरच येतोय असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलंय.


       
Tags: AkolaSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

Next Post

मोदींना देश तोडायचा आहे

Next Post
मोदींना देश तोडायचा आहे

मोदींना देश तोडायचा आहे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन
बातमी

अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन

by mosami kewat
January 11, 2026
0

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची न्यू तापडिया नगर,...

Read moreDetails
भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

January 11, 2026
ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पुण्यात निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पुण्यात निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

January 11, 2026
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी

अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी

January 11, 2026
अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

January 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home