Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

मोदींना देश तोडायचा आहे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in राजकीय
0
मोदींना देश तोडायचा आहे
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा

चंद्रपूर : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला.

पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. देशाचा एकोपा जो आहे यातील सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे.

आरएसएसशी आमचे मतभेद कायम आहेत. पण मी मोहन भागवतांना विचारतो की, मागील अडीच वर्षांत आपण किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना तुम्ही सांगितलं आहे की, आपण भेटलं पाहिजे, असा सवाल आंबेडकर यांनी मोहन भागवतांना केला.

या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील, तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा. कारण, प्रचार करताना भाजपचा उमेदवार आहे असे सांगितले जात नाही, तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते. त्यामुळे भाजप संपला आहे अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. 30 टक्के मतदार हा जरांगे पाटील म्हणतील तसे मतदान करणार आहे.


       
Tags: chandrapurCongressMohan Bhagwatnarendra modiPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रचाराच्या धामधुमीत सुजात आंबेडकर बेशुद्ध !

Next Post

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

Next Post
पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा
बातमी

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

by mosami kewat
September 10, 2026
0

- संजीव चांदोरकर  “नेपाळ जलप्रलय” निमित्ताने !  त्याची थरकाप उडवणारी दृश्ये / फोटो, आकडे बघत/ वाचत असतो, त्याची पुनरुक्ती नाही...

Read moreDetails
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026
राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

September 10, 2026
ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

September 10, 2026
प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home