बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
यासंदर्भात त्यांनी बौद्ध समाज संवाद दौऱ्याच्या प्रतिनिधींसमवेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (PES) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे भेट दिली.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सुजात आंबेडकर आणि त्यांच्यासोबतच्या प्रतिनिधींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.