मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्ञानेश कुमार हटाव मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचीही उपस्थिती होती.
उपस्थित समुदायाला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी म्हटले की इथला आंबेडकरवादी लोकशाही रक्षणासाठी लढत राहील. तसेच, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यावर उपहासात्मक करत म्हटले की, भाजपचे तीन स्टार प्रचारक आहेत सीबीआय, ईडी आणि ज्ञानेश कुमार. तसेच लोकशाही रक्षणासाठी इथला आंबेडकरवादी हा कायम लढत राहील असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले.





