Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
November 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही छटपूजेला विरोध केला आहे. मात्र, आता या विरोधाची व्याप्ती वाढली असून हा विरोध भाषेच्या आधारावर केला जात आहे. भाषा हीसुद्धा एक प्रकारची सब नॅशनॅलिटी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भावनिक मुद्द्यांच्या आधारे भाषेचा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यातून भाषिक द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे.

भाषेच्या आधारावर जगभरात अनेक राज्ये आणि देशांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे भाषेच्या नावाखाली द्वेषाची ठिणगी पाडणाऱ्यांना मी देशविरोधी मानतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कारवाई होणार आहे की नाही, याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

जुन्या शालेय नोंदी व अंत्यविधीच्या पद्धतींवरून जात वैधता नाकारणे बेकायदेशीर; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जात पडताळणी समितीला निवेदन!

भाजपने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कारवाई केली तरच सरकार खरोखर कारवाई करत आहे, असे मी मानेन. मात्र, भाजपने कारवाई केली नाही, तर स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा वापर केला जात आहे, असे स्पष्ट होईल, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मांडलेल्या कॉर्पोरेटच्या वर्चस्वाच्या मुद्द्याचाही संदर्भ दिला. देशात ज्या पद्धतीने कॉर्पोरेट व्यवस्था उभी केली जात आहे, त्यातून देशाचे विघटन होण्याची शक्यता असून उद्याचे राज्य हे लोकशाही व्यवस्थेऐवजी कॉर्पोरेटच्या नियंत्रणाखालील राज्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कारवाई करत नसेल, तर कॉर्पोरेटचे वर्चस्व निर्माण करण्याच्या मोठ्या राजकीय योजनेचा हा एक भाग आहे, असे मला वाटते. राज्याच्या जागी कॉर्पोरेटचे जग उभे करण्याचा भाजपचा डाव पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा वापर केला जात आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सावध राहावे, असा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.


       
Tags: bjpChhath pujaMaharashtraNSAPoliticalPrakash AmbedkarRaj ThackerayUddhav ThackerayVanchit Bahujan Aghadi
Previous Post

महागाईचे विष!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
November 15, 2026
0

मुंबई : मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना...

Read moreDetails
महागाईचे विष!

महागाईचे विष!

November 15, 2026
जुन्या शालेय नोंदी व अंत्यविधीच्या पद्धतींवरून जात वैधता नाकारणे बेकायदेशीर; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जात पडताळणी समितीला निवेदन!

जुन्या शालेय नोंदी व अंत्यविधीच्या पद्धतींवरून जात वैधता नाकारणे बेकायदेशीर; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जात पडताळणी समितीला निवेदन!

November 15, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

November 13, 2026
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

November 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home