अकोला : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा अकोला येथे चर्चा दौरा सुरू आहे. अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला. यावेळी चर्चा दौऱ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

या चर्चा दौऱ्या दरम्यान बोलताना सुजात आंबेडकर यांनी पक्षाच्या बूथ बांधणीवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली. ते म्हणाले, “बूथ बांधणी करून तळागाळातील लोकांना पक्षाशी जोडून त्यांना वंचित बहुजन आघाडीचे ध्येय समजून सांगावीत. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रतिबंध आहे. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी निवडणूक प्रचार यंत्रणा, पक्षाचे मुद्दे आणि धोरणे यावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.
“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!
हा चर्चा दौरा अकोला जिल्ह्यातील खालील सर्कल्समध्ये आयोजित करण्यात आला होता –
शिर्ला / चोंढी / विवरा सर्कल
आलेगाव / पिंपळखुटा / सस्ती सर्कल
कान्हेरी / राजंदा सर्कल
झोडगा / पिंजर सर्कल येथे आयोजित करण्यात आला होता.

या दौऱ्यात वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोंगरे, महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुजात आंबेडकरांच्या या दौऱ्यामुळे अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.





