Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

mosami kewat by mosami kewat
November 13, 2025
in बातमी, मनोरंजन
0
“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील नामांकित लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक फ्लायिंग किंग मंजू यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला “बेगूर कॉलनी” हा चित्रपट कर्नाटक राज्यात तब्बल १०० दिवस यशस्वीपणे प्रदर्शित होत प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. चित्रपटाला मिळालेल्या या मोठ्या यशाबरोबरच त्याचा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने करण्यात आल्याने संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीवरून या चित्रपटाचे हिंदी रूपांतर करण्यात आले असून त्याला “बी.आर. आंबेडकर मैदान” हे नाव देण्यात आले आहे. हिंदी आवृत्तीचे डबिंग, लेखन व दिग्दर्शन रोनक मोसेस जानुमाला यांनी केले असून हे संपूर्ण काम J.A.D. PRODUCTIONS PVT. LTD. चे हेड ऑफ प्रॉडक्शन सतीश भटू आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईतील राजगृह येथे करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य चेतन गांगुर्डे, मा. भटू आहिरे, पोस्टर डिझायनर युवराज रोहिदास आहिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरसेवक जितूभाऊ शिरसाठ आणि शिरपूर नगरपालिका नगरसेवक सुरेश आहिरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडले.

शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

चित्रपटातील उत्कट आणि उत्साहवर्धक गीत सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले असून त्यांच्या दमदार आवाजामुळे चित्रपटाला वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आहे.

“बी.आर. आंबेडकर मैदान” हा चित्रपट लवकरच संपूर्ण देशभर प्रदर्शित होणार असून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाचे वास्तव आणि प्रभावी चित्रण प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रदर्शना पूर्वीच प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: AmbedkariteFilmBegurColonyBRAmbedkarMaidanFlyingKingManjuKannadaCinemaprakashambedkarRonakMosesJanumalavanchitbahujanaghadi
Previous Post

जनधन खात्यांचा प्रश्न : खाती नाही, अर्थविश्व ‘डॉर्मंट’ आहे!

Next Post

Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

Next Post
Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home