मुंबई : चेंबूर ते वडाळा मार्गावर धावणाऱ्या मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी काढल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली आहे.
कामावरून कमी करण्यासंदर्भात अचानक नोटीस बजावण्यात आल्यानंतर आज या सर्व कर्मचाऱ्यांनी राजगृह, मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. गेली ५-६ वर्षांपासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोणतेही ठोस कारण न देता अचानक कामावरून काढण्यात आले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहणार आहे.