वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक तनुजा रायपूरे यांचे आवाहन !
गडचिरोली : राजकीय, सामाजीक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित असणा-यांची व सोबतच ईतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची लढाई एकटे ॲड.बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. ही हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापासून ते ग्रामपातळी पर्यंत महिला संगठन मजबूत करण्याचे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक तनुजा रायपूरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले. वंचित बहुजन महिला आघाडी तालुका गडचिरोलीच्या वतीने येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे होत्या तर जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, जिल्हा महासचिव अश्विनी जांभूळकर, तालुका प्रभारी श्वेता झाडे, शहराध्यक्षा सिमा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी तनुजा रायपूरे यांनी तालुका व शहरातील महिला पदाधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला, जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्रभागनिहाय तात्काळ समित्या गठीत करून महिला संगठेची बांधणी तात्काळ करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकिला तालुका व शहर कमिटीच्या महिला कार्यकर्त्या शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या.