सोलापूर : आरपीआय आठवले गटाचे सोलापूरचे युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांनी अधिकृतपणे त्यांच्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आरपीआय (आठवले गट)ला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
सुमित शिवशरण हे आक्रमक नेतृत्व, युवकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद सोलापूर शहरात वाढणार असल्याचे बोलले जातंय.
प्रवेशावेळी सुमित शिवशरण म्हणाले की, “सत्तेच्या सौद्यापेक्षा विचारांची लढाई महत्त्वाची आहे. फुले–शाहू–आंबेडकरांचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे.






