Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in Uncategorized, बातमी
0
पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎
       

पुणे : राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुणे घाट परिसरासाठी पुढील २४ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या (State Emergency Operation Centre) माहितीनुसार, ‘Sachet’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या सात दिवसांत सुमारे २५३.७४ कोटी नागरिकांना हवामानाचे अलर्ट संदेश पाठवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.‎‎

राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये रत्नागिरीतील जगबुडी, रायगडमधील अंबा आणि ठाण्यातील काळू या नद्यांचा समावेश आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचीही स्थिती गंभीर आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि आंबेगाव तालुक्यात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, घोडनदीत अडकलेल्या पाच व्यक्तींना ‘आपदा मित्र’ दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.‎‎

राज्याच्या किनारी भागांमध्येही समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‎‎प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन‎‎

पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती अजूनही कायम आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या विसर्गावर सतत लक्ष ठेवले जात आहे. कृष्णा नदीची पातळी वाढल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे, उजनी धरण पूर्ण भरल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.


       
Tags: AgricultureBhima riverMaharashtraMonsoonpunePune rainRed AlertRiver
Previous Post

हिंगणघाटमध्ये दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना, शहरात भीतीचं वातावरण

Next Post

इंदापूरच्या बाभुळगावात आदिवासींवर लाठीचार्ज प्रशासनाच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

Next Post
इंदापूरच्या बाभुळगावात आदिवासींवर लाठीचार्ज प्रशासनाच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

इंदापूरच्या बाभुळगावात आदिवासींवर लाठीचार्ज प्रशासनाच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !
अर्थ विषयक

“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !

by mosami kewat
October 31, 2025
0

संजीव चांदोरकर फक्त सप्टेंबर महिन्यात देशात क्रेडिट कार्ड वापरून २,१७,००० कोटी रुपयांची खरेदी केली गेली. एक ऐतिहासक उच्चांक! ऑक्टोबरचा आकडा...

Read moreDetails
कामगार एकतेचा शतकी प्रवास - आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

कामगार एकतेचा शतकी प्रवास – आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये 'वर्धा लाईव्ह' फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वर्धा लाईव्ह’ फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 31, 2025
अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

October 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home