अकोला : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, या यादीत ११ उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असल्याची माहिती पक्षाच्या अधिकृत हॅंडलवरुन दिली आहे. यामध्ये हिंगोलीतून डॉ. बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढामधून रमेश बारसकर, साताऱ्यामधून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुल रहेमान, हातकणंगलेमधून दादासाहेब चवगोंडा पाटील, रावेरमधून संजय पंडित ब्राम्हणे, जालनामधून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अबुल हसन खान आणि रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून काका जोशी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.
तसेच, पहिली आणि दुसरी यादी मिळून आत्तापर्यंत २० उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून, उर्वरित मतदारसंघ आणि उमेदवार कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.