नवी मुंबई : सीवूड्स परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासमोर तीव्र निदर्शने केली. १५ दिवसांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे विभाग अध्यक्ष ॲड. उमेश हातेकर यांनी यावेळी दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून सीवूड्समधील नागरिक खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप ॲड. हातेकर यांनी केला. आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आयुक्त कैलास शिंदे यांच्या गाडीसमोर निदर्शने केली.
यावेळी ॲड. उमेश हातेकर यांनी महानगरपालिका परिसरातील रस्ते आणि नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यांमध्ये दुजाभाव का, असा सवाल उपस्थित केला. बाहेर काढा, बाहेर काढा, आयुक्त साहेब खड्ड्यातून आम्हांला बाहेर काढा, आयुक्त साहेब, आपल्या बंगल्यासमोरील जसा रस्ता आहे, तसाच सीवूड्सवासीयांना बनवून द्या, अशा घोषणांनी पालिका मुख्यालयासमोरचा परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव साक्षीताई लोटे, समाजवादी पक्षाचे नवी मुंबई उपाध्यक्ष मिथुन कांबळे, माधुरीताई सरोदे, अक्षय भंडगे, स्वप्निल येवले, नितीन पाडळे, तनवीर शेख, संघपाल मनवर, आणि संघदीप झनके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर...
Read moreDetails